शिरूरच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावठी जातीच्या गोवंशांचे कत्तलीपासून वाचविले प्राण

शिरूरच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावठी जातीच्या गोवंशांचे कत्तलीपासून वाचविले प्राण
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २२/०३/२०२४.

दिनांक २१/०३/२०२४ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास, पुण्याजवळील पेरणे फाटा येथुन अहिल्यानगर कडे काही गाई व बैल कत्तलीसाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती, मानद पशुकल्याण अधिकारी गौरव शिंदे यांना मिळ्याल्यानंतर, त्यांनी लगेचच त्यांचे विश्वासू सहकारी व बजरंग दल शिरूर प्रखंडाचे संयोजक अजिंक्य तारु यांना सदर माहिती कळवीली. अजिंक्य तारु व त्यांच्या सहकाऱ्यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत, MH 12 RN 2397 हा मारुती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी टेंपो, शिक्रापूर बाजुकडून अहिल्यानगर बाजुकडे भरधाव वेगाने जाताना दिसताच, तो अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो टेंपो थांबला नाही. त्यामुळे बजरंग दलाच्या या कार्यकर्त्यांनी त्या टेंपोचा पाठलाग केला असता, खंडाळा माथ्याच्या पुढे आल्यावर तो टेंपो चालकाने रस्त्याच्या कडेला थांबवुन तेथून पळ काढला. टेंपोची पाहणी केली असता, सदर टेम्पो हा पुर्णपणे बंद होता. परंतु आतून जनावरांचा आवाज येत होता. त्यामुळे त्याचा दरवाजा उघडला असता, त्यामध्ये २ खिलार गाई व १ गोऱ्हा, १ गावरान गाई व १ गावरान गोऱ्हा, १ जर्सी गोऱ्हा, असे ६ गौवंश दाटीवाटीने कोबुन भरलेले दिसले त्यातील १ गाई खाली पडली होती, गौरक्षकांनी त्वरीत रांजणगाव पोलिस स्टेशनशी संपर्क साधत, सदर गाडी पोलिस स्टेशनला जमा केली व गाडी मालकावर, गोवंश हत्याबंदी कायदा अंतर्गत विविध गुन्हे दाखल करुन, सदर वाचवलेले ६ गोवंश “श्री गौरक्ष पांजरपोळ संस्था, शिरुर” येथे सुखरुप सोडण्यात आले आहेत. यासाठी गोशाळेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे तारु यांनी सांगितले.
या कारवाईत बजरंग दल शिरुर प्रखंड संयोजक अजिंक्य तारु, बजरंग दल रांजणगाव संयोजक रवी जगदाळे व त्यांचे सहकारी अमोल लुनिया, गणेश इंदोरे, विशाल पवार, श्रीकांत रांजने, विशाल शिंदे, शिव कदम, गौरव लोढा, प्रतिक शर्मा या गोरक्षकांनी मोलाची कामगिरी केली.
कारवाई यशस्वी करण्यासाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघ प्रदेशअध्यक्ष मिलिंद एकबोटे, अखिल भारत कृषी गौसेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष उपेंन्द्र बलकवडे, मानद पशुकल्याण अधिकारी अभिजित चव्हाण, ऋषी चावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *