अमरावतीत भाजप तर रामटेकमध्ये शिवसेना, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये देखील तिढा निर्माण झाला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. महायुतीत कोणताही तिढा नाही, ५ मिनिटात चर्चेतून प्रश्न सुटतील अशी परिस्थिती असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीत ६ ते ७ जागांवरुन तिढा आहे पण तो चर्चेतून सुटेल. रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेला जाणार आहे. तर अमरावती मतदारसंघ भाजपकडे असेल.

अमरावतीत महायुतीचे सर्व भाजप उमेदवाराला पाठिंबा देतील. आम्ही सर्वांशी चर्चा करु. सर्व जागांवर चर्चा सुरू आहे. काही जागा भाजपला देखील सोडाव्या लागणार आहेत. बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे. अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत. काही ठिकाणी राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शिवसेना जिंकू शकते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अमरावतीच्या जागेसाठी बच्चू कडू यांची मदत घेऊ, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. अमरावतीचा उमेदवार लवकरच जाहीर करु, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

अमरावतीत सध्या विद्यमान खासदार नवनित राणा आहेत. तर त्या जागेवर अनंतराव अडसूळ देखील इच्छुक आहेत. अनंतराव यांनी नुकतीच चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तर डे खासदार नवनीत राणा यांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अमरावतीत भाजप कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *