मातंग एकता आंदोलन शिरूरच्या वतीने, अण्णाभाऊंची जयंती उत्साहात साजरी : सतीश बागवे, शहराध्यक्ष

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. ०२ ऑगस्ट २०२१.

     मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस आय पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी ग्रह  राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या प्रेरणेने, शिरूर शाखेच्या वतिने साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
      संघटनेचे तालुकाध्यक्ष राजा भाऊ पाटोळे यांच्या शुभहस्ते प्रातिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला . याप्रसंगी भिमछावा संघटनेचे अध्यक्ष गोरख ससाणे, बहुजन समाज पार्टीचे पंडित ससाणे, लहुजी शक्ती सेनेचे बंटी जोगदंड, झोपडपटटी सुरक्षा दलाचे विजय जगधने, चेतन साठे, मयुर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब जाधव, काका पाटोळे, अविनाश शिंदे, शिवाजी पवार, सागर शिंदे, श्रीकांत बागवे, रेखा पाटोळे, दिपाली जाधव, संगीता बागवे यांनी केले. सुत्रसंचालन अविनाश शिंदे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष सतिष बागवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *