नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ नोव्हेंबर २०२२


खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती जपता आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूची माणसं. ही माणसंच उद्धव ठाकरे यांना जपता आली नाहीत, असं नवनीत राणा म्हणाल्या.

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष ताजा असतानाच खासदार नवनीत राणा यांनी एक नवं विधान केलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती जपता आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूची माणसं. ही माणसंच उद्धव ठाकरे यांना जपता आली नाहीत, असं नवनीत राणा म्हणाल्या. सत्ता संघर्षाचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित नाही. पण येत्या काळात महायुती अशीच घट्ट राहील. शिंदे आणि फडणवीस असंच एकत्र राहून महाराष्ट्राच्या हिताचं काम करतील, असा विश्वास आहे. त्यामुळे 2024 लाही युतीचीच सत्ता येईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *