काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे प्रतिनीधी
दि.16/05/2021

राज्यसभेचे खासदार तथा 2014 मध्ये हिंगोलीतून निवडणू आलेले तसेच काँग्रेस च्या कार्यकारी समितीचे निमंत्रक असलेले युवा नेतृत्व राजीव सातव यांचे पुणे येथे उपचारादरम्यान कोरोनामुळे निधन…
2014 मध्ये हिंगोलीतून खासदारपदी निवडून आलेले सातव हे सलग चार वेळा संसदत्न पुरस्काराने सन्मानित असून संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादात त्यांचा सहभाग होता सातव हे आखील भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरातचे प्रभारी होते.
2010 ते 2014 भारतीय युवा काँग्रेस चे अध्यक्ष पद सातव यांनी भूषविले आहे.

22 एप्रिल रोजी सातव यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 23 दिवसापासून सातव हे व्हेंटिलिटरवर होते.राजीव सातव यांचे आज रविवार दि.16 मे रोजी उपचारादरम्यान निधन झाले…

माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र, उच्चशिक्षित , साधे राहणीमान व अभ्यासू नेते अशी ओळख, त्यांना 4 वेळ संसदरत्नत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल गांधींचे अगदी निकटवर्ती होते. 2002 हिंगोळीच्या कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य झाले. नंतर
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. 2007 मध्ये पशुसंवर्धन समितीच्या सभापती पदी निवडून गेले. 2008 मध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड. 2010 साली अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2014 मध्ये खासदार होऊन दिल्लीत गेले. सलग खासदार होते. गुजरातचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. मार्च 2020 मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. राहुल गांधी यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली.

आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *