नारायणगाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय “नवउद्योजक कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात”

नारायणगाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय “नवउद्योजक कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात”

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
ग्रामोन्नती मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र, आयोजित रोटरी क्लब नारायणगाव हायवे , निर्विघ्न अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय “नवउद्योजक कौशल्य विकास कार्यशाळा” महाविद्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर अनिश होले (व्यावसायिक सल्लागार निर्विघ्न अकॅडमी ,पुणे)
यांनी उद्योजक होण्यासाठी सर्वात पहिले स्वतःला आवडेल असा व्यवसाय निवडायचा इंटरशिप करायची ज्ञान आणि अनुभव, संधी ,व्यावसायिक सेवा, भांडवल क्षमता , जागेची विशेषता , वस्तूची मागणी ,सहाय्य , नफा या सर्व गोष्टींची आवश्यकता असते असा सकारात्मक संदेश दिला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.शिवाजी टाकळकर वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ मधुरा काळभोर यांनी केला .
मा .रो. पंजाब कथे यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करा कारण वाणिज्य विभागात रोजगाराच्या अनेक संधी असून नवनवीन उद्योग व्यवसाय उभारण्यास मदत होते असे सांगितले तसेच मा.रो.रवींद्र वाजगे, रोटरी क्लब अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित केले. मा.शामराव थोरात रोटरी क्लब माजी अध्यक्ष यांनी उद्योजक होण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मकता असावी तसेच भीती नसावी व स्वतःचे काम करताना पूर्ण मन लावून करावे अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ .जे.पी .भोसले यांनी उद्योजक होण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळा गुण असावा असे नवउद्योजक कौशल्य विकास कार्यशाळा कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.कुलकर्णी यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी या अंतर्गत इंटर्नशिप सुरू करण्याचा सकारात्मक संदेश मनोगत व्यक्त करताना दिला. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
समारोप प्रसंगी अदिती चाळक, ऐश्वर्या भोर , प्राची शेंडे या विद्यार्थिनींनी त्यांचे कार्यशाळेबद्दलचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.जी.बी.होले , डॉ.श्रीकांत फुलसुंदर, प्रा.आकाश कांबळे, प्रा.गजानन जगताप उपस्थित होते. तर डॉ.व्ही.टी.पाटे, डॉ.ए.ए. जगदाळे, डॉ. मधुरा काळभोर,डॉ.व्ही.एस.मोढवे प्रो.पी.व्ही.आवटे, प्रो.टी.पी.वाघ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ.सौ.अनुराधा घुमटकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सारिका जगदाळे यांनी केले. आभार प्राध्यापिका डॉक्टर मधुरा काळभोर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *