भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात आला – ऐश्वर्या पांडव

भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात आला- ऐश्वर्या पांडव

पुणे:११-‘तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने या समाजाचा सन्मान केला आता आम्ही खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येऊन समाज उपयोगी कामे अधिक जोमाने करू शकतो नुसतेच तृतीयपंथी नव्हे तर समाजातील इतर घटकांसाठी तृतीयपंथी प्रकोष्ट तितक्याच तत्परतेने काम करेल’ असा विश्वास प्रकोष्ठच्या अध्यक्षा ऐश्वर्या पांडव यांनी व्यक्त केला.


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पुण्यामध्ये किंबहुना देशांमधील पहिला तृतीय पंथी प्रकोष्ठाची स्थापना करण्यात आली
या वेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, सरचिटणीस प्रियांका शेंडगे,आरती कोंढरे, भावना शेळके, स्वाती मोहोळ, उज्वला गौड आदी पदाधिकारी उपस्थित होत्या ह्यावेळी ३२तृतीयपंथी भगिनींनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *