मन आणि मनगट कणखर बनवा – प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१३ जानेवरी २०२२

नारायणगाव


स्वामी विवेकानंदांनी आपल्या संपूर्ण जगण्यातून तरुणांसाठी सकारात्मक जीवनशैली सांगितली आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी मन आणि मनगट कणखर बनवा कारण कणखर आणि खंबीर माणसंच ठरविलेले ध्येय प्राप्त करू शकतात असे स्वामीजी सांगतात. राजमाता जिजाऊ आणि स्वामीजींचे तत्त्वज्ञान ही वर्तनात आणण्यासाठी प्रयत्न करा असे मनोगत प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.नारायणगांव येथील धर्मवीर संभाजी पतसंस्था, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नारायणगांव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी

याप्रसंगी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, युवा नेते अमित बेनके,धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख,भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डेरे, प्रा.डॉ.मिलिंद कसबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, माजी उपसरपंच आशिष माळवदकर , ग्रा प सदस्य राजेश बाप्ते, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संचालक कैलास औटी, विठ्ठल श्रीवत, एकनाथ तांबे, बापू गायकवाड, विजय डेरे, विनायक डेरे, समविचारी मंचचे जितेंद्र गुंजाळ,शरद दरेकर,राजेश रत्नपारखी प्रा.रत्नाकर सुबंध,प्रा. हेमंत महाजन, हेमंत कोल्हे,स्वप्नील डेरे, प्रा. कपिल डेरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पराक्रम,शौर्य,वीरता या संस्कारांबरोबरच मूल्य संस्कारही केले आहे. जिजाऊ या आमच्यासाठी राजमाता, वीरमाता ,राष्ट्रमाता आहेत असे मनोगत डॉ.प्रा.आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.यावेळी सरपंच योगेश पाटे,अमित बेनके यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष माळवदकर यांनी केले सूत्रसंचालन मेहबूब काझी,शरद दरेकर यांनी केले व आभार राखी रत्नपारखी यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *