उंब्रज येथे घराजवळ खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला..चिमुकला गंभीर जखमी..

उंब्रज येथे घराजवळ खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला..चिमुकला गंभीर जखमी..

बातमी -प्रतिनिधी कैलास बोडके

उंब्रज नंबर १ (ता. जुन्नर ) येथील हाडवळा नामे शिवारातील वस्तीत रहाणाऱ्या व आपल्या घराचे ओट्यावर खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने चिमुकला गंभीर जखमी झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.जखमी बाळास तात्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर दुर्दैवी व हृदय पिळवटून टाकणारी ही घटना दि.११ रोजी सायंकाळी ६ वा.३० मिनिटांचे सुमारास घडली असून आरुष सचिन शिंदे (वय वर्ष 3 ) असे या चिमुकल्याचे नाव आहे.
दरम्यान बिबट्या हल्ला करते वेळी आरूषची आई भाग्यश्री शिंदे या घरातच होत्या तसेच घराचे बाजूला ऊस तोडणी कामगार ऊस तोडण्याचे काम करीत होते त्यांच्या ही हल्याची घटना निदर्शनास येताच त्यांनी व मुलाचे आई ने बिबट्यास आरडाओरड करीत जोरदार प्रतिकार केला त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पलायन केले.
स्थानिक ग्रामस्थ आणि ऊसतोड कामगार यांनी त्वरेने प्रसंग अवधान दाखविल्याने पुढील अघटीत दुर्घटना टळली असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक के. जि. भालेराव, आर. बी. गवांदे हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *