नारायणगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत वाणिज्य विभाग संशोधन केंद्राच्या वतीने गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद “सस्टेनेबल प्रक्टीसेस अँड रिसेंट ट्रेंडस इन कॉमर्स, मॅनेजमेंट, सायन्सेस, एग्रीकल्चर, हायर एज्युकेशन, लॉ, इंजिनियरींग, हेल्थ अँड फार्मसी” या विषयावर घेण्यात येत आहे.
प्रस्तुत आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दुबई, बांगलादेश, कॅनडा, काठमांडू, नेपाळ, बँकॉक, थायलंड, सूरतथानी – थायलंड, श्रीलंका आणि भारतातील विविध राज्यातून ११० प्राध्यापक, उद्योजक, संशोधक, वकील, डॉक्टर आणि १०० विद्यार्थी संशोधक उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी देशातून आणि जगभरातून १३० संशोधन पेपर्स प्राप्त झाले आहेत.
ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपाध्यक्ष सुजित खैरे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, उपकार्यवाह अरविंद मेहेर हे मार्गदर्शन मदत व सहकार्य करीत आहेत.
आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी प्राचार्य डॉ. ए. बी. कुलकर्णी, प्रा. डॉ. जे. पी. भोसले, प्रा. डॉ. एस. डी. टाकळकर आणि डॉ. अनुराधा घुमटकर यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *