सिद्धी आर्वीकर यांचे बँकॉक येथे संशोधन पेपर सादरीकर

नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम पुणे, ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, पुणे आणि फरानाखोन राजाभट युनिव्हर्सिटी बँकॉक, थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व आंतरशाखीय शैक्षणिक परिषदेत कुमारी सिद्धी स्वाती श्याम आर्वीकर हिने “उद्योजकीय शिक्षण आणि प्रशिक्षण – आव्हाने व संधी” या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण केले. जगभरातील ५० विद्यार्थ्यांनी आणि १०० प्राध्यापकांनी सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंधाचे सादरीकरण केले. विद्यार्थी गटात कुमारी सिद्धी स्वाती श्याम आर्वीकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस, मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. थायलंडच्या पंतप्रधानांचे सल्लागार पिचाइ नरिप्थाफन, फरानाखोन राजाभट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रियांग कित्रातपोर्न, अरुणाचल प्रदेश मधील हिमालयन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रकाश दिवाकरण यांच्या हस्ते कुमारी सिद्धी आर्वीकर हिला गौरवण्यात आले. कुमारी सिद्धी हिला तिच्या परिषदेतील सहभागासाठी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर, व प्राचार्य डॉ.ए.बी. कुलकर्णी यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी आणि प्राचार्य ए. बी. कुलकर्णी यांनी बहुमोल प्रोत्साहन व सहकार्य केले. शोधनिबंध तयार करून घेणे आणि त्याबाबत संशोधन मार्गदर्शन करणे यासाठी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.जे.पी.भोसले यांनी विशेष परिश्रम केले.
सिद्धी आर्वीकर हिचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग आणि समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *