कंपन्यांना त्रास देणा-या समाजकंटकांवर कडक कारवाई केली जाईल : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

दि. २०/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक बैठक पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याबरोबर नुकतीच झाली. यावेळी कोणीही समाजकंटक किंवा संघटित गुन्हेगारी करणारे गुंड यांच्याकडून त्रास होत असल्यास उद्योजकांनी किंवा कंपनीच्या प्रतिनिधींनी न घाबरता पोलिसात तक्रार द्यावी; अशी सूचना यावेळी चौबे यांनी यावेळी उपस्थितांना केली.

ब्रिजस्टोन कंपनीच्या मिटिंग हॉलमध्ये  शुक्रवारी ही बैठक झाली. चौबे यांनी शासनाच्या निर्देशांवरून पुढाकार घेऊन पोलीस विभाग व कंपनी व्यवस्थापक यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळेस त्यांनी ही सूचना केली.

ते म्हणाले;  प्रतिनिधींना काहीही तक्रार असल्यास त्यांनी समक्ष पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, अथवा फोनवर गोपनीय तक्रार द्यावी. तसेच यापुढे उद्योग क्षेत्राला विनकारण त्रास देत असलेल्या असामाजिक तत्वांवर  कारवाई करून कंपनी प्रतिनिधींना  योग्य ते सहकार्य करण्यात येईल. उद्योग क्षेत्राशी निगडित कोणतीही अडचण निर्माण करणारा घटक मग तो कोणत्याही पक्षाचा, जातीधर्माचा असला तरीही त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आवाहन केले.

या बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त चौबे यांच्यासह , पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी , कोल्हापूर परिक्षेत्र, मनोज लोहिया, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदीप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, पिंपरी चिंचवड, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी चिंचवड, तसेच महाळुंगे पोलीस चौकीचे ज्ञानेश्वर साबळे, चाकण पोलीस ठाण्याचे वैभव शिंगारे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रंजीत सावंत, भोसरी पोलीस ठाण्याचे भास्कर जाधव व भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राजेंद्र निकाळजे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते.

यासोबत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शिवहरी हलन, खजिनदार विनोद जैन, सचिव दिलीप बटवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय चाकण एमआयडीसी मधील मर्सिडीज कंपनीचे सारंग जोशी, ब्रिजस्टोन कंपनीचे शिवाशिश दास, न्यू हॉलंड कंपनीच्या शितल साळुंखे, ह्युंडाई कंपनीचे मनीष फणसाळकर स्कोडा,  व्होक्सवॅगन कंपनीचे रामहरी कुटे तसेच चाकण भोसरी तळेगाव व खेड एमआयडीसी मधील 210 कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *