रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी : दि ४ मार्च २०२१
माउंट एव्हरेस्ट व कंचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नवोदित गिर्यारोहकांनी तासुबाई डोंगर रांगेतील, गडद येथील 250 फूट उभ्या कातळ कड्यावर प्रथम चढाई करून प्रस्तरारोहण मार्ग खुला केला. व कड्याला दुर्गेशवर असे नाव देण्यात आले.
दुर्गेश्वर कड्यावर चढाई करणारे हे पहिलेच गिर्यारोहक ठरले आहेत.
खेड – राजगुरूनगर तालुक्यातील चाकण – वांद्रे खिंड रोड वरील गडद गावा नजीक उभ्या कातळ कड्यात कोरलेल्या पुरातन लेणी आहेत. या लेण्यांमध्ये दुर्गेश्वराचे पुरातन मंदिर आहे. याच कातळकड्यावर गौरव लंघेने प्रथम चढाई करत मोहीम यशस्वी केली. पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरींग क्लब ने येथे नुकतीच प्रस्तरारोहन मोहीम आयोजित केली होती. त्यात उदयोन्मुख, तरुण गिर्यारोहक गौरव लंघे ने ही कामगिरी केली.
संपूर्ण चढाई ची जबाबदारी गौरव ने पारपाडली. तर साहिल कांबळे, सचिन शहा, व ओंकार बुर्डे यांनी त्याला रोप ने सुरक्षा पुरविली. ही मोहीम दोन टप्यात पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत गौरव लंघे, धनराज साळवी, ओंकार कुटे, सचिन शहा, साहिल कांबळे, ओंकार बुर्डे, अनिकेत जाधव, मालोजी ढोकले, व गडद गावातील स्वप्नील कौदरे, सुमित कौदरे यांनी सहभाग घेतला.