Shirur । रयत बँक मंचरच्या वतीने कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न…

रयत बँक मंचरच्या वतीने कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न…
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १५/०२/२०२४.
रयत शिक्षण संस्थेच्या “दि रयत सेवक को – ऑपरेटिव्ह बँक ली. सातारा,” शाखा मंचरच्या वतीने, ८२ – ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त, मंचर शाखेच्या कार्यक्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांतील रयत सेवकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दि. १०/०२/२०२४ रोजी, मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयातील पंढरीनाथ बारवे सभागृहात पार पडला.


यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पच्छिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य उदय शिवाजीराव पाटील, जनरल बॉडी सदस्य प्रा राजाराम बाणखेले, संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य उत्तम आवारी, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आनंदराव तांबे, लाईफ मेंबर निलेश बाणखेले, मुख्याध्यापक दादा जाधव, जयवंत झेंडे, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी तसेच रयत बँक मंचर शाखेचे चेअरमन सुरेश तिटकारे, सभासद प्रतिनिधी धनश्री ताठे, सभासद प्रतिनिधी दिनेश लाडके, मंचर बँकेचे शाखाधिकारी शैलेंद्र कांबळे, बँकेचे कर्मचारी दिलीप गुरव, रामचंद्र जाधव, ओमकार देवकर व विद्याराणी थोरात, आदी मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सन २०२१-२२ व २२-२३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
त्यात शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी साठी पात्र झालेले विद्यार्थी –
शौर्य दत्तात्रय चासकर, ऋतिका सोमनाथ इंदोरे, सोहम दगडु लांघी, सई सुभाष गुंजाळ व ध्रुव विठ्ठल पांडे.
ई. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी –
आर्या विकास गोसावी (राजुरी, जुन्नर), वैभवलक्षमी प्रकाश सोनवणे (चांडोली, आंबेगाव), शंतनु नितीन बाणखेले (मंचर), प्रांजल संजय पडघनकर (महाळूंगे पडवळ, आंबेगाव), संभव प्रमोद मुळुक (राजगुरुनगर), पूर्वा रवींद्र खुडे (मलठण, शिरूर), श्रेया राजेंद्र पडवळ (मंचर), सोहम संतोष दरेकर (मंचर).
२०२१-२२ NNMS परीक्षा –
अनुष्का संजय ढमाले (९३ गुण, चासकमान, खेड), व यश संतोष भागित (८२ गुण, महळूंगे पडवळ).
शासकीय चित्रकला स्पर्धा सन २०२१-२२ मध्ये “अ” श्रेणी प्राप्त विद्यार्थी –
साक्षी दगडू लांघी व पृथा तानाजी खोमणे.
मार्च २०२२ मध्ये ई १० वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
मयुरी पोपट शेंडकर (नारायणगाव, ९७.८०%), आर्या गुलाब वाघ (लांडेवाडी ९४८०%), सोहम संतोष शिंदे, (चिंचोली, आंबेगाव ९३.४०%), गौरी शिवाजी लोहटे (मंचर ९१.२०%), आर्या संदीप तांदळे (वाघोली ८९.८०%), मानसी दादासाहेब जाधव (शिवाजीनगर, पुणे ८७.८०%), उत्कांक्षा भिमाजी लंघे (धामणी ८७.८०%), पवनकुमार रामकृष्ण राजगुरु (धामणी ८६.४०%), सर्वेश संजय ढमाले (चासकमान ८३%), सिद्धी महेंद्रकुमार तोरडमल (बारामती ८२%) व चैतन्य नितीन सासवडे (मंचर ८०%).
ई १२ वी शास्त्र बोर्ड परीक्षा –
श्रावणी यादव चासकर, मंचर (बोर्ड परीक्षेत – ८९.६७%, CET – ८५.७९ पर्सेंटाइल), चैतन्य संजय कोल्हे (चाकण, ८५.५०%), श्रिराज भागचंद बांगर (कोंढवा, पुणे) बोर्ड परीक्षेत ८३.८३%, CET – ९९.३९ व JEE – ९४.५९ पर्सेंटाइल तसेच NEET परीक्षेत ५४२ गुण, समर्थ महेंद्रकुमार तोरडमल (CET – ८६.३१ पर्सेंटाइल).
राष्ट्रीय पातळीवर खो खो स्पर्धेत सहभाग घेतलेल्या मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया संदीप चव्हाण हीला विशेष सन्मानित करण्यात आले.
सन २०२२-२३ मध्ये ई. ५ वी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
आराध्या संजय गोरडे (शिंगवे, आंबेगाव गुण २८०), समृद्धी दिलीप बेंडूरे (२७८), अनय अविनाश गुरव (शिक्रापूर, गुण २६८) व वेदांत संजय पडघनकर (पिंपळगाव तर्फे महाळुंगे, गुण २४०).
नवोदय विद्यालयात प्रवेश –
सई सुभाष गुंजाळ व आराध्या संजय गोरडे.
ई ८ वी शासकीय स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केलेल्या, जान्हवी जगदीश गुरव (मंचर, गुण २७०), सत्यम शिवराम मुंजावडे (महाळुंगे पडवळ, गुण २५६), पार्थ विलास लोखंडे (२५४) व रोहित विजय शेळकंदे (मंचर १८६).
शासकीय चित्रकला स्पर्धा २०२२-२३ मध्ये “अ” श्रेणी – म. गांधी विद्यालय मंचर – श्रेया राजेंद्र पडवळ.
सन २०२३ च्या १० वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी –
ओम ज्ञानेश्वर निमोणकर (पिंपळे जगताप, ९७.३३%), ओमकार घेवरचंद भाइक (अवसरी, ९५.६०%), वेदांत रामदास पिंगळे (लांडेवाडी, ९४.८०%), सोहम मारुती गुंजाळ (मंचर ९४.८०%), पृथा तानाजी खोमणे (पुणे, ९४.६०%), हिमांशू प्रल्हाद चौधरी (महाळुंगे पडवळ, ९४.२०%), सेजल सदानंद भवारी (बेल्हे, ९४.२०%), ज्ञानेश्वरी लक्ष्मण धराडे (आळे, ९२.८०%), सिद्धेश दत्तात्रय खोरे (मंचर, ९२%), साक्षी दगडू लांघी (महाळुंगे पडवळ ९०.६० %), सिद्धार्थ रामेश्वर राऊत (चिंचवड, पुणे ८९.८०%), श्रुतिका संदीप इचके (कवठे येमाई ८९.६०%), समृद्धी मनोहर क्षीरसागर (मंचर, ८७.८०%), अलोक संजय तारु (मंचर, ८५.४०%), प्रेरणा प्रमोद चपटे (नारोडी, ८२.८०%).
फेब्रुवारी २०२३ मधील १२ वी शास्त्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थि –
गायत्री गोरक्ष फुलसुंदर (देहूरोड ८४.६०%), मयुर विलास इंगळे (कोंढवा, ८२.३३%), वेदांत किरण गाढवे (पिंपळे जगताप, ८०.३३%), अनिष सुभाष बांगर (राजुरी, जुन्नर ८०.३३%), देविका संतोष शेटे (मंचर ८०%), तसेच अभियांत्रिकी प्रवेश पात्रता परीक्षेत श्रेयस चंद्रकांत शिंदे याने ९८.२७% पर्सेंटाइल.
रयत टॅलेंट सर्च परीक्षेत बेल्हेश्वर विद्यामंदिर ची निवेदिता नितीन मुळूक या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत ५ वे स्थान प्राप्त.
२०२२-२३ मध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी –
डॉ श्रेया चंद्रकांत शिंदे – एम बी बी एस
डॉ दिप्ती रामराव मंडलिक – बी ए एम एस
डॉ प्रांजली जयवंत झेंडे – बी ए एम एस
डॉ श्रेयस पोपट शेंडकर – बी ए एम एस
अशाप्रकारे विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व रयत बँक मंचर शाखेच्या कार्य क्षेत्रातील रयत सेवकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान रयत बँकेच्या मंचर शाखेच्या वतीने करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपल्या मनोगतातून भरभरून शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव टेमकर सर यांनी केले, तर आभार लाडके सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *