हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी मेळावा हॉटेल कलासागर पिंपरी मध्ये संपन्न….

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी मेळावा हॉटेल कलासागर पिंपरी मध्ये संपन्न….

Pimpri : आपल्या शाळेतील सन 1990 ची मराठी मध्यामची बॅच परीक्षेनंतर 34 वर्षांनी एकत्र येऊन विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा केला.
तत्कालीन NCC Officer व निवृत्त माजी उप मुख्याध्यापक श्री. पांडूळे सर लाभले होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शाळेच्या प्रथेप्रमाणे शालेय प्रार्थना व राष्ट्रगीताने या स्नेहमेळाव्याची सुरुवात केली ,
सर्वप्रथम उमेश सुरवाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील रिकामे यांनी पुणेरी पगडी व शाल श्रीफळ देऊन सरांचा सत्कार करण्यात आला,तदनंतर आपले वर्गमित्र श्री भूषण ओझर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा, कॉलनी, एच ए कंपनी यांच्या विषयी सद्भावना व कृतज्ञता व्यक्त केली.
“शिक्षकांकडून ज्ञान व मार्गदर्शन मिळत असले तरी विद्यार्थ्यांकडून अखंड ऊर्जा मिळत असते”
रोजच्या जीवनातील शिस्त,शारीरिक क्षमता,व्यायाम,प्रथमोपचार,प्रसंगावधान इ. गोष्टींचे महत्त्व सांगितले.


काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत असे दिसून आले की “जो परिस्थितीशी झगडतो…तोच आयुष्यात घडतो”…असे भावनिक प्रसंगही अनुभवता आले.
भूषण ओझर्डे चे कामही नावाप्रमाणेच भूषणावह आहेच..
बरेच सहकारी मित्र उच्च पदावरती काम असतानाही शालेय जीवनातील खोडकरपणा जिवंत ठेवल्याची प्रचिती आली.
असे अनेक छोटे मोठे प्रसंग आपण यशशिखरावर असताना एकमेकांना शेअर करण्याचा आनंद काही औरच असतो…या आनंदाची शिदोरी पुढील भेटीची ओढ कायम ठेवण्यास पुरेशी आहे,
या लज्जतदार जेवणाबरोबर एकत्रित आलेल्या मैत्रीचा तडका कोणीच विसरू शकणार नाही…
नाच गाणी,दांड्या आणि शेवटी खऱ्या अर्थाने “झिंगाट”या गाण्याला न्याय देणारा प्रमुख पहुण्यानसह सर्वांचा सहभाग म्हणजे एकप्रकारची पर्वणीच होती….
हे सर्व घडवून आणण्यासाठी काहींना जिवाचं रान करावं लागलं ती आपल्यापैकीच काही खास उल्लेखनीय वर्ग मित्र/मैत्रिणी….
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील रिकामे,उमेश सुरवाडे,विजय प्रगणे,अनिस नदाफ, शरीफ शेख ,मीना सूर्यवंशी,परवीन दलाल कल्याणी कल्याणी प्रभुणे इ.
“सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद!!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *