निगडीत मोठ्या उत्साहात मोहम्मद पैगंबर जयंती साजरी 

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२

निगडी


निगडी  जगाला शांतीचा संदेश देणारे  मोहम्मद पैगंबर जयंती( इद ए मिलादुन्नबी) अ आणि फ प्रभाग जुलूस कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. निगडी येथील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल शेजारी आयोजित केलेल्या सभेमध्ये कारी समशाद अली अशरफी यांनी कुराण पठण केले तर मौलवी इस्तियाक अहेमद यांनी प्रवचन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,सहाय्यक पो आयुक्त डॉ सागर कवडे,माजी नगरसेवक सचिन चिखले, सुलभा उबाळे,पंकज भालेकर,शांतारामबापू भालेकर, सामाजिक कार्यकर्ते झीशान सय्यद,बापू घोलप,आप्पा सोनवणे, वैशाली पवार, मौलाना हाफीज रजा नूरी, जुलूस कमिटीचे अध्यक्ष आलम बाबा शेख आदी उपस्थित होते. यावेळी शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जुलूस मध्ये सहभागी झालेल्या सुमारे २ हजार  नागरिकांना खीर चपातीचे वाटप करण्यात आले.

हजरत महम्मद पैगंबर यांच्या मदिनाच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.रूपीनगर आणि निगडी परिसरातून काढलेली मिरवणूक  महामार्गाने पिंपरी पर्यंत काढण्यात आली. निगडी आकुर्डी रूपीनगर परिसरातील १८ मंडळे, सुमारे ४ हजार भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलम बाबा शेख,मोइन भाई,मास्टर हुसैन,सुलतान तांबोळी,इजाज खान,नूर कॉट्रॅक्टर,फारुख शेख, मोहसीन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *