यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी -प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे
यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी असे उद्गार प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले .ते पुढे म्हणाले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सुमारे चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल जातीभेद रहित राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य केले. बालपणापासूनच ते विचारी ,विवेकी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे कर्तृत्व घडविले . ते ज्ञानोपासक होते. सुसंस्कृत व नैतिक अधिष्ठान असलेले संयमी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पहावे लागते .
या बातमीचा आढावा आमचे तासगाव तालुका प्रतिनिधी राजु थोरात यांनी घेतला आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख प्रा. आर.बी. मानकर यांनी केले तर आभार एम.बी.ए. विभागाचे केंद्रसंयोजक डॉ.के.एन.पाटील यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक गुरुदेव , विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.