छ शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरूर आयोजित स्व धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला आजपासून सुरुवात

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.

अवघ्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जगभर साजरी केली जाते.
त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही “श्री छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती” च्या वतीने, दरवर्षी शिरूर शहरात “स्व धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला” आयोजीत केली जाते. या व्याख्यान मालेचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. यंदा ही पाच दिवसीय व्याख्यानमाला गुरुवार दि. १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत असुन, समारोप पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही व्याख्यानमाला दरवर्षी प्रमाणेच यंदाही शिरूर शहरातील कॉलेज रोडवरील साई गार्डन मंगल कार्यालय येथे होणार असुन, दररोज संध्याकाळी ६.४५ वा. व्याख्यान असणार आहे.
व्याख्यानमालेचे वेळापत्रक –
१) गुरुवार दि. १५/०२/२०२४ –
प्रा डॉ. श्रीरंजन आवटे (विषय – भारत माता की जय).
२) शुक्रवार दि. १६/०२/२०२४ –
पत्रकार चंद्रकांत झटाले (विषय – मजबुती का नाम महात्मा गांधी).
३) शनिवार दि. १७/०२/२०२४ –
ह भ प धर्मकिर्ती महाराज परभणीकर (विषय – शिवकाळ आणि आजची परिस्थिती).
४) रविवार दि. १८/०२/२०२४ –
प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रा डॉ प्रकाश पवार (विषय – छ शिवाजी महाराज आणि सामाजिक सलोख्याची राजनीती).
५) सोमवार दि. १९/०२/२०२४ –
मुंबई येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट डॉ गिरीश जाखोटिया (विषय – छ शिवाजी महाराज आणि २१ वे शतक).
अशा अतिशय चांगल्या व समाजाला प्रेरणा मिळणाऱ्या या व्याख्यानांचा लाभ समस्त शिरूरकरांनी घेण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. ही सर्व व्याख्याने विनामूल्य असुन, ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील QR Code स्कॅन करून उत्सव समितीच्या खात्यावर देणगी देण्यास हरकत नसल्याचेही आवाहन कार्यक्रम पत्रिकेद्वारे करण्यात आलेले आहे. तसेच व्याख्याने बुद्धिजीवी वर्गासाठी असल्याने अतिशय लहान बालकांना कृपा करून आणू नये अशी विनंती करण्यात आली आहे.
सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. शिरूर बस स्टँड जवळील शिवसेवा मंडळाबाहेर छ शिवरायांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात येणार असुन, या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *