प्रतिनिधी-कैलास बोडके
पिंपरी पेंढार (प्रतिनिधी)-खामुंडी(ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पध्दती मध्ये साजरी करण्यात आली यावेळी डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून विस्तार अधिकारी व विद्यमान सरपंच यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्या नंतर काही मान्यवरांनी अभिवादन केले. गावात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणुन काय काय उपाय करता येतील या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी रत्ना शिरसाठ, ग्रामसेवीका रेखा गोडे,सरपंच वनराज शिंगोटे उपसरपंच विश्रांती बोडके, सदस्या सुरेखा भोर, सदस्य सत्यवान डुंबरे,ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संदिप साठे,आरोग्य सेविका वंदना जाधव, आरोग्य सेवक अर्जुन बढे, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश शेलार ,कौतूभ गंभीर राजेंद्र वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वडगाव आनंद येथील ५ तर आळे येथील ६ दुकाने सीलबंद | तहसीलदार हनुमंत कोळेकर यांचे आदेश
विभागीय संपादक रामदास सांगळे आळेफाटा:-साथ रोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी वडगाव आनंद ग्रामपंचायत…