पळस्टिका फाटा येथील अनाथ मुलाच्या बालकाश्रमातून ११ वर्षीय मुलगा बेपत्ता

घोडेगाव –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पळस्टीका ता.आंबेगाव जि.पुणे येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मंचर संचालित बालगृह पळस्टीका येथील ११ वर्षीय मुलगा संतोष संजय वाघमारे हा दिनांक 05/09/2023 रोजी सदर अनाथ मुलांचे संगोपनासाठी आसणारे बलगृहातुन बेपत्ता झाला असून आश्रमाच्या अधीक्षकांनी सदर घटनेबाबत हरवल्याची फिर्याद दिली आहे घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर 462/2023 भा.द.वि.कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी दिली.
मुलाचे वर्णन खालील प्रमाणे. उंची -4फूट 1इंच, रंग – सावळा, नाक – सरळ, केस- डोकिस काळे मध्यम केस, उजव्या खांद्यावर तीळ, अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट, नेसनीस निळ्या रंगाची पँट, पायात काळ्या रंगाची चप्पल .
वरील वर्णनाचा मुलगा मिळून आल्यास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
1) किरण भालेकर (सहा. पोलीस निरीक्षक) मोब. नं.9561678956
2)महेश सरेश पवार (पोलीस उपनिरीक्षक ) मोब. नं.9423380424

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *