जेष्ठ तमाशा कलावंत तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांनी घेतला वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास…

विजय कोल्हे
सांस्कृतीक संपादक

नारायणगाव- दि २५ मे २०२१
कला भूषण मास्टर रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री श्रीमती कांताबाई सातारकर तमाशा सम्राज्ञी म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे त्यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी संगमनेर मध्ये निधन झाले.
वयाच्या ५ व्या वर्षी पायात चाळ बांधून कलेला सुरवात केली. अगोदर सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे प्रवास करत त्यांनी मुंबई गाठले. मुंबईत एका संस्थेत २० रु महिन्याने कामाला सुरवात केली . नंतर एका तमाशा फडात काम केले. अनुभवाच्या जोरावर कारकीर्द उजाळत गेली तर परत मागे फिरून पहिलेच नाही. कै तुकाराम खेडकर यांच्यानंतर फार मोठ्या अडचणीच्या काळात कला भूषण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा तमाशा मंडळाची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोक शिक्षणातून लोक जागृत करण्याचे काम केलं अशा महा लोककलेच्या महाराणीचा आज अंत झाला त्यांच्या कुटुंबावर ती कोसळलेल्या दुःखामध्ये राज्यातील सर्व तमाशा फडमालक सर्व तमाशा कलावंत तमाशाचे हितचिंतक सर्व पत्रकार साहित्यिक त्यांच्या कुटुंबावर ते प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी नारायणगाव चे ग्रामस्थ व यात्रा कमिटी अखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषद व महा कला मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीमती कांताबाई सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा आत्ताच वृद्धापकाळाने निधन झालं त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हीच परमेश्वर जवळ प्रार्थना शोकाकुल राज्यातील सर्व तमाशा फडमालक , कलावंत , चाहते त्यांच्या जाण्याने हळहळ वेक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *