खोडद येथे वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणारी बंटी बबलीची जोडी ४८ तासात जेरबंद

नारायणगाव
खोडद (ता. जुन्नर) येथे सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी धनवट मळा येथील जेष्ठ महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय ७० वर्षे) या एकट्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्यांचा खून केला होता. त्यांच्या घरातील कपाट उचकटलेले व कपडे अस्ताव्यस्त पडलेले निदर्शनास आले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. ग्रामीण भागात भर दिवसा खून झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांची पथके तयार करून गुन्ह्याची उकल करण्याची सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार अवघ्या ४८ तासात परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार या खूनातील आरोपी शोधण्यास पोलिसांना यश आले आहे.

 


या घटनेतील आरोपी हे बंटी और बबली नवरा बायको असून आरोपी शिवम उर्फ संकेत श्याम श्रीमंत व २१ वर्ष व पूनम संकेत श्रीमंत वय २० वर्ष दोघेही मूळ राहणार गजानन नगर, चिखली ता. चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी मयत सुलोचना टेमगिरे यांच्या राहत्या घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून सोन्याच्या दागिनाबाबत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आले असून तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही आरोपी नवरा बायको असून आठ दिवसापूर्वीच खोडद येथील धनवट मळा परिसरात ते शेतात मजुरीसाठी आले होते.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, विनोद धुर्वे, जगदेव आप्पा पाटील, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे,अक्षय नवले, संदीप वारे, शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धीरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी यशस्वी तपास केला.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी आरोपींना ४८ तासात कशाप्रकारे अटक केली, यासह इतर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *