सबनीस विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

सबनीस विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
======================
छात्र सैनिकांचे नेत्रदीपक संचलन, समूहगीते,नृत्य व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.

नारायणगाव किरण वाजगे कार्यकारी संपादक
ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराच्या प्रांगणात संस्थेच्या सर्व विभागांच्या सहभागातून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सदस्य डॉ. संदीप डोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुजित खैरे , कार्यवाह रवींद्र पारगावकर, यांसह सर्व संचालक व सर्व विभागांचे प्रमुख,शिक्षक, विद्यार्थी व पालक,नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी उपस्थितांना मुख्याध्यापिका अनुराधा पुराणीक यांनी गणराज्य दिनाची प्रतिज्ञा दिली.


प्राचार्य डॉ. राहुल गोंगे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. मुख्याध्यापिका अनघा जोशी यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ दिली. उपमुख्याध्यापक सतीश तंवर यांनी स्काऊट गाईडचे वचन दिले .प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी यांनी छात्रसैनिकांना प्रतिज्ञा दिली यानंतर एन.सी.सी.प्रमुख डॉ.दिलीप शिवणे व रोहित भागवत,स्काऊट गाईडचे प्रमुख सुनील ढवळे,अनुपमा पाटे,निर्मला मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी नेत्रदीपक संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,


श्री.अनंतराव इंग्लिश मीडियम स्कूल,श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन,श्रीमती एस. आर.केदारी बालक मंदिर, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ग्रामोन्नती मंडळाचे बीएड कॉलेज यांनी समुहगीत,विविध प्रात्यक्षिक व नृत्यांचे सादरीकरण केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागांतील राज्य, राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडू व कलाकार विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख बबन गुळवे आणि प्रा.रमेश शेटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *