रोटरी क्लब हायवे तर्फे शिक्षकांचा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गुणगौरव

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१९ जानेवारी २०२२

नारायणगाव


रोटरी क्लब नारायणगाव हायवे, रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर आणि शिवाजी टाकळकर सहजीवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट टिचर अर्वाडचे आयोजन ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी नुकतेच करण्यात आले. मिटिंग कॉल टू ऑर्डर प्रेसिडेंट रो. रवींद्र पाटील पुणे लोकमान्य नगर यांनी कार्यक्रमास राष्ट्रगीताने सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे प्रेसिडेंट रो. डॉ. शिवाजी टाकळकर यांनी केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. कथे डायनास्टिकचे संस्थापक रो. डॉ. पंजाबराव कथे यांनी ऑनलाइन शिक्षणातील शिक्षकांचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. मान्यवर गौरी ग्रुपचे एम.डी. गणेश पठारे यांनी यशस्वी व्यवसायाकरिता लागणारे ज्ञान तसेच गुरुजनांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन. व्होकेशनल सर्विस डायरेक्टर डिस्ट्रिक्ट ३१३१ रो. अजय वाघ यांनी रोटरीच्या कार्याविषयी माहिती सांगून सर्वच विविध भागातील ऑस्ट्रेलियन हे तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत मदतीचा हात कशाप्रकारे पोहोचवितात याविषयी माहिती दिली.

प्रा. डॉ.शिवाजी टाकळकर यांच्या संकल्पनेनुसार कार्यक्रम यशस्वी

वेलॉक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक डॉ. मंगेश आमले यांनी शिक्षकांमुळे मी कसा घडलो, तसेच आपल्या व्यवसायातील ज्ञानासाठी गुरुचे सहकार्य या विषयी मनोगत व्यक्त केले. तर आपला पहिला गुरू म्हणून आपल्या आईची महती सांगितली. रो. सन्मित शहा एम.डी. एजुस्किल्स प्रॅक्टिकल्स यांनीसुद्धा आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांविषयी असणारा आदर भाव व्यक्त केला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी शिक्षकांप्रति आदरभाव टिकण्यासाठी आपल्या भूमिकेवर ठाम असावे असे सांगून बदलत्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी असे म्हटले. रो. रवींद्र पाटील प्रेसिडेंट रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन तसेच पुण्यातील शहरी भागात रोटरी करत असणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा दिला. या कार्यक्रमात रोटरी क्लब नारायणगाव हायवे ने तयार केलेल्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून वाटप केले. तसेच सदर दिनदर्शिकेसाठी योगदान देणाऱ्या अतिथींचे सन्मान रो. श्यामराव थोरात यांनी केले. बेस्ट टिचर अवॉर्ड साठी उच्च शिक्षण विभागात काम करत असणाऱ्या शिक्षकांची यादी रो. श्रीकांत फुलसुंदर यांनी जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते प्रा. संतोष लांडे, डॉ. इंदिरारानी औसार, डॉ.प्रीती सोनार नाशिक, डॉ. ज्ञानदेव राऊत केडगाव, डॉ‌. मार्सकिन फर्नांडिस इंदिरा कॉलेज पुणे, डॉ.शुभांगी गायकवाड, पुणे डॉ. संजय अरगडे, कोपरगाव, डॉ. सखाराम उघडे मंचर, डॉ. नालंदा वाणी, प्रा. बाळासाहेब ढमाले यांना प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह व छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा देऊन सन्मानित करण्यात आले.


ऑनलाइन शिक्षणातील जिल्हा परिषद शाळेतील महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठी प्रत्येक शनिवारी काम करणाऱ्या शिक्षकांची यादी रो.रवींद्र वाजगे यांनी जाहीर करून या टीम मधील संगीता ढमाले, उषा टाकळकर, प्रशांत ढवळे, साईनाथ कानिंगध्वज, संजय रणदिवे, पुष्पलता डोंगरे, भारती आल्हाट, शुभांगी पाडेकर, यांनाही प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, छत्रपतीशिवाजी महाराजांचा अर्धपुतळा देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्तींच्या मनोगतात डॉ. नालंदा वाणी, डॉ. प्रीती सोनार, डॉ. इंदिरारानी औसारे, डॉ. संजय अरगडे, साईनाथ कलिंगध्वज यांनी मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमामध्ये रो. मधुरा किरण काळभोर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. यश श्रीकांत फुलसुंदर जुन्नर तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्राविण्य मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. अनुप शिवाजी टाकळकर एम.बी.बी.एस पदवी प्राप्त झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. रो सुकाजी मुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुकाजी मुळे यांनी यांनी उपस्थितांना वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपून सर्वांना मास्कचे वाटप केले.

या प्रसंगी राजाराम पाटे संस्थापक अध्यक्ष एल.डी.सी. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील निवड केलेले सत्कारार्थी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी रो. किरण वाजगे, रो.आबा जगदाळे, रो.सचिन मोढवे, रोटरी क्लब नारायणगाव हायवे येथील सर्व रोटरीयन व रोटरीअँन्स उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कोरोणाचे सर्व नियम पाळून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मधुरा काळभोर यांनी केले तर रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे आय. पी.पी.रो.अंबादास वामन यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *