बातमीदार : रोहित खर्गे (विभागीय संपादक)
पिंपरी दि. ३०, उत्तरप्रदेश येथील हाथरस तालुक्यातील बूलगाडी या गावामध्ये झालेल्या युवतीवरील सामुहिक अत्याचार व हत्याकांडाचा निषेध सांगवी येथे निषेधसभेद्वारे करण्यात आला.
स्व.वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ स्व.मनिषा वाल्मिकी या युवतीस मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.
या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “ स्व. मनिषा वाल्मिकी या युवतीवर झालेल्या सामुहिक अत्याचार व हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे या प्रकाराचा करावा तेवढा निषेध कमी आहे. एवढी भयानक घटना घडूनही पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशिलता समाजात चीड निर्माण करणारी आहे यावरून उत्तरप्रदेशातील योगी सरकारचा खरा चेहरा समोर येतो व कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती यावरून स्पष्ट होते. यापुर्वी सुध्दा अशा दलित अत्याचाराच्या व हत्याकांडाच्या घटना तेथे घडल्या आहेत. वास्तविक पाहता या भयावह परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असलेले मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे अशी प्रमुख मागणी आम्ही करत आहोत. तसेच याबाबत त्वरित पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करावे व या प्रकाराची न्यायलयीन प्रकिया जलदगती न्यायलयात करावी अशी मागणी युवक काँग्रेस च्या वतीने करत आहोत याबाबत जर त्वरित अंमलबजावणी करण्यात आली नाही तर अधिक तीव्रतेने जनआंदेलन करण्यात येईल.”
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे, गिरीधर माने, ओंकार पवार,श्रेयस बायत,ओम चौधरी, रोहित जगताप आदि उपस्थित होते.