संजय सीताराम कुऱ्हाडे वर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी खामुंडी 
१६ ऑक्टोबर २०२१

ओतूर

जुन्नर तालुक्यातील महत्वाची मानली जाणारी बाजार पेठ ती म्हणजे आळेफाटा आणि याच गावा जवळील आळे गावचे संजय सीताराम कुऱ्हाडे ( व्यवसाय समाज सेवा, सध्या राहणार देशमुख होम्स, कल्याण शीळ रोड ) यांच्या वर ओतूर पोलीस स्टेशन येथे खुबी येथील एका इसमा कडून दारू धंद्यासाठी पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणावरून आणि जातीय वाचक शिवी दिली म्हणून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनं चे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली असून संजय सीताराम कुऱ्हाडे यास अटक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

खंडणी मागितल्याच्या कारणावरून आणि जातीय वाचक शिवी दिली म्हणून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल-ओतूर पोलीस

त्याच बरोबर कुऱ्हाडे यास कुणीही नघाबरून त्याने जर आणखी कुणाकडून खंडणी मागितली असेल किव्हा घेतली असेल तर न घाबरता पोलीस स्टेशनं ला त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन देखील कांबळे यांनी केले आहे.

परशुराम कांबळे – सहा. पो. निरीक्षक

या घटनेचा पुढील तपास जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *