उद्योजक कृष्णकुमार गोयल यांना आंतरराष्ट्रीय रोटरी सेवा पुरस्कार

पुणे प्रतिनिधी

रोटरी सेवा पुरस्कार हा रोटरीच्या आंतरराष्ट्रीय मूल्ये आणि उद्दिष्टे अमलात आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केला जातो.
२०२३-२४ चा हा मानाचा पुरस्कार प्रथितयश उद्योजक कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना समारंभपूर्वक रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षांचे प्रतिनिधी मायकेल मॅकगवर्न यांच्या हस्ते प्रदान केला गेला.याप्रसंगी रोटेरी ३१३१च्या प्रांतपाल मंजू फडके, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक `शिकारपूर व क्रेडाई कुशलचेजे. पी. श्रॉफ उपस्थित होते.

मॅकगवर्न ह्यांनी याप्रसंगी गोयल यांच्या प्रदीर्घ समाजसेवेचा गौरव केला.गोयल यांनी याप्रसंगी पुरस्काराबद्दल रोटरी इंटरनॅशनलचे आभार मानले.’क्रिएट होप इन द वर्ल्ड’ हे २०२३-२४ या रोटरी वर्षांचे बोधवाक्य आहे. उद्योजक कृष्णकुमार आपल्या कृष्णकुमार गोयल फाउंडेशनमार्फत सामाजिक बांधीलकी जपत
अनेक क्षेत्रात सामाजिक प्रकल्प राबवत आहेत. तसेच पर्यावरणपूरक ‘रोटरी ग्रीन सोसायटी’ प्रकल्प कोहिनूर ग्रुपच्या सर्व प्रकल्पात राबवायचा मानस त्यांनी या प्रसंगी व्यक्त कृष्णकुमार गोयल यांना आजवर अनेक सामाजिक संस्थाचे पुरस्कार मिळाले आहे.परंतु जागतिक स्तरावर काम करणा-या आणि देशभरातून पोलीयो निर्मूलन करणा-या इंटरनॅशनल रोटरी क्लब च्या वतीने आंतरराष्ट्रीय सेवा पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *