उद्योजकता विकास कार्यक्रम रांजणगावला संपन्न : ग्रा. पं., बँक ऑफ महाराष्ट्र व महागणपती स्कूलचा उपक्रम
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. ०५/०१/२०२४.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे, महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र व ग्राम पंचायत रांजणगाव या तिघांच्या संयुक्त विद्यमाने, गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी, महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे होत्या.
उद्योजकता विकास कार्यक्रमा अंतर्गत, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे धर्मेंद्रभाई राजपूत यांनी, ग्रामोद्योग स्वावलंबन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी साबण, दंत मंजन, निळ, टॉयलेट क्लिनर व फिनाईल ही उत्पादने समक्ष बनवत प्रशिक्षण दिले. या वस्तू घरच्या घरी बनवल्यास कसा फायदा होतो याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, रांजणगाव गणपती शाखेचे प्रबंधक विक्रमजीत सिंग व अन्य मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी रांजणगाव गणपतीच्या प्रथम महिला लोक नियुक्त सरपंच सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे, नवनिर्वाचित उपसरपंच श्रीकांत उर्फ बबलू प्रभाकर पाचुंदकर पा., महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक विकास शेळके, अण्णा हजारे न्यास, राळेगण सिद्धीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, प्रताप खेडकर, ज्ञानेश्वर वायदंडे, तुषार खेडकर, ग्राम विकास अधिकारी गंगाधर देशमुख, शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.