विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूरच्या वतीने आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूरच्या वतीने आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. ०५/१/२०२४.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर च्या वतीने अजिंक्य मोरेश्वर तारु यांनी शिरूर पोलीस स्टेशन ला पत्र देत, जितेंद्र आव्हाड यांनी परवा शिर्डी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना “श्रीराम मांसाहारी होते” या विधानाला आक्षेप घेत, समस्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते, पदाधिकारी व सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देत, जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अजिंक्य तारु यांनी दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, “जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या विधानाचा आम्ही सर्व जाहीर निषेध करत असुन, त्यांच्यावर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल भा. दं. वी. का. कलम २९५ नुसार तात्काळ गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा शिरूर तालुका विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाजातर्फे, शनिवार दि. ६ जानेवारी २०२४ रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याबाबत काही घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *