रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी : दि १ मार्च २०२१
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पद वाटप आणि आढावा बैठकीचा आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधीपक्षनेते विठ्ठल काटे, प्रवक्ते फाजल भाई शेख, ज्ञानेश्वर कांबळे, गोरक्ष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कोरोनाचे सर्व नियम पळून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन कार्यकर्त्यांना मान्यवरांनी कशा पद्धतीने काम करायचं याच मार्गदर्शन केलं.
यावेळी कार्यक्रमात बोलताना संजोग वाघेरे म्हणाले कि, तुम्ही नवीन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जोमाने काम करा. कारण आपल्याला भविष्यात महानगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करायची आहे. तुम्ही निश्तितच चांगल्या पद्धतीने केलं तर २०२२ ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेलं. असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला.