नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसने घेतला पेट

०८ डिसेंबर २०२२


नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं.इतकंच नाही तर या बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *