माणसातला कोहिनुर कृष्णकुमार गोयल यांचा ७० वा अभिष्टचिंतन सोहळा बालगंधर्व पुणे येथे दिमाखात संपन्न

27 नोव्हेंबर रोजी कोहिनूर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचा सत्तरावा वाढदिवस पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे मानसातला कोहिनूर या पुस्तकाचे प्रकाशन करून साजरा करण्यात आला यावेळी पद्यश्री डाॅ.अरूण फिरोदीया यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णकुमार गोयल सर यांना सन्मानित करण्यात आले… ज्याचे आयोजन कृष्णकुमार गोयल गौरव समितीचे  सुनील प्रभाकर महाजन यांनी केले.
तसेच कोहिनूर ग्रुप चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या 70 या वाढदिवसानिमित्त विविध विषयांवर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सत्तरहून अधिक संस्थेतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला  उद्योग सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,सहकार,व बँकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृष्णकुमार गोयल यांनी सातत्याने योगदान दिले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत कृष्णकुमार गोयल यांचा हा गौरव करण्यात आला.

तसेच डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपिता डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते माणसातला कोहिनूर या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले  यावेळी जेष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे व महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई अध्यक्ष विद्याधर आगस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यास,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,साहित्यिक रामदास फुटाणे,राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष राजेश पांडे,माजी आमदार जगदीश मुळीक,आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी,,सूर्यदत्ता ग्रुपचे अध्यक्ष संजय चोरडिया,,सचिन इटकर डॉक्टर विनोद शहा व आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे हे उपस्थित होते व ya कार्यक्रमाचे सूत्रसंचालन dr. संजय चाकणे यांनी केले.तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांनी रंगमंचावर कृष्णकुमार गोयल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *