राज्यातील पदवीधरांचा करंट्या सरकारवर निवडणुकीत रोष व्यक्त होईल : चंद्रकांत पाटील

  • पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी शैक्षणिक संस्थांना भेटी
  • शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रचाराचा धुरळा

पिंपरी | प्रतिनिधी
राज्यातील करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान झाले आहे. त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख शैक्षणिक संस्था, संस्था चालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग व पदवीधर मतदार भेट दौरा केला.

यावेळी भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणमधील ज्ञान प्रबोधिनी नवघर विद्यालयातील पाटील यांनी शिक्षकांशी संवाद साधला. तसेच, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदानासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाटील यांनी केले. संस्था प्रतिनिधी प्रा.मनोज देवळेकर, प्रा. सावंत उपस्थित होते. तसेच, कमला एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित चिंचवडमधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेलाही भेट दिली. यावेळी संस्था अध्यक्ष दिपक शहा, प्रा. राजेंद्र कांकरीया उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद…

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या (PCCOE) विद्यार्थ्यांशीही पाटील यांनी संवाद साधला. करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे जे नुकसान झाले आहे. त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करेल, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. यावेळी संस्था संचालक ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, पद्मा भोसले, शांताराम गराडे, प्रा. देसाई, प्रा. रवांदळे आदी उपस्थित होते.

…या संस्थांमध्येही भेट अन प्रचार!

चिंचवडमधील जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री. उत्तमचंद जैन विद्यालय व अध्यापक महाविद्यालय (बी.एड)च्या शिक्षकांशी पाटील यांनी संवाद साधला. यावेळी मानद सचिव राजेंद्र मुथ्था, प्रा. काळे यांच्यासह नगरसेविका करुणा चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, शितल शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, धनंजय शाळीग्राम, अजित कुलथे उपस्थित होते. सेवा विकास सहकारी बँक कर्मचारी वर्ग भेट घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमर मुलचंदानी उपस्थित होते. निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुलमधील शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संस्था संचालक शरद इनामदार उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमधील मृत्यूंजय एज्युकेशन सोसायटी संचालित नृसिंह हायस्कूलमधील शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी संस्था अध्यक्ष एकनाथ ढोरे, प्रा. कदम उपस्थित होते. ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे संचालित राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यपकांशी‌ संवाद साधला. यावेळी संस्था संचालक रवि सावंत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *