नारायणगाव ते शिर्डी सायकलवारीत ७ जिल्ह्यातील ३२७ सायकलस्वार सहभागी

महिला सायकल स्वारांचा उत्स्फूर्त सहभाग

नारायणगाव :- (किरण वाजगे कार्यकारी संपादक)
नारायणगाव तालुका जुन्नर येथील शिवजन्मभूमी फाउंडेशन सायकलवारी टीमतर्फे किल्ले शिवनेरी गडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन तसेच मशाल घेऊन नारायणगाव ते शिर्डी सायकलवारीचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले. या सायकलवारीमध्ये सात जिल्ह्यातील ३२७ सायकलस्वार सहभागी झाले होते.
येथील साई भक्त धनंजय बाजीराव माताडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सायकलवारीचे सातवे वर्ष होते. ठाणे, अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून तसेच बारामती पुणे, राजगुरुनगर येथील सायकलस्वार सहभागी झाले. या सायकलवारीचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू सार्थक पावसे याने काही किलोमीटर अंतर आपल्या भारत देशाचा ध्वज हातात घेऊन स्केटिंग करत सायकलस्वारांचा उत्साह वाढवगला.
सायकलवारीचा प्रारंभ विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर , आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, नवनिर्वाचित सरपंच शुभदा वाव्हळ, उपसरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, वारूळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर, जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
सायकलवारीतुन या तरूणांनी १२५ किलोमीटर अंतर दोन दिवसात पार करत पर्यावरणाचा संदेश देत ,भक्ती व युवा शक्तीचा संगम घडवून आणला.
समाजामध्ये निरोगी आरोग्य राहावे सायकलिंग करणे वाढावे म्हणून १) नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे व गणेश पाटे २) ईश्वर पाटे युवा_ उद्योजक नारायणगाव३) राजेंद्रभाऊ मेहेर -सरपंच वारूळवाडी ग्रामपंचायत४) तुषार भोर व वैभव भिसे येडगाव सायकलिस्ट क्लब
५) बाळासाहेब आरेकर सर खेड व डॉ.संजय दीक्षित कोरेगाव ६) मोरया सायकल, राजगुरुनगर ७) अर्चना इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर अशोक खांडगे या सात दानशूर व्यक्तींकडून नारायणग ते शिर्डी सायकलवारीमध्ये सहभागी होणाऱ्या सात भाग्यवान विजेत्यांना सात सायकली भेट देण्यात आल्या.
सायकलस्वारांच्या आरोग्य सेवेसाठी धनेश वारुळे व संजय भोर यांनी ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली. वारीमध्ये डॉक्टर तेजस दिवटे डॉक्टर भोर, डॉक्टर लहू खैरे यांनी सायकल स्वारांच्या आरोग्याची काळजी घेतली.
या सायकलवारीचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत केले.
सायकलवारी यशस्वी पार पडण्यासाठी शिवजन्मभूमी फाउंडेशनचे सदस्य संकेत वाघ, ऋतिक माताडे,संतोष गुंजाळ,सागर शिंदे ,आदित्य गायकवाड ,सविता कोळेकर , स्मिता रायचंद शिंदे, शिल्पा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *