स्वरा मुजिकल्स प्रस्तुत “सुरमयी शाम” या हिंदी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

शनिवारी दिनांक 2 डिसेंबर ला प्राधिकरणातील ग दि मा सभागृहात जुन्या मराठी हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाचे स्वरा मुजिकल्स तर्फे ऍड .शोभा कदम यांनीआयोजन


केले व त्यास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, लाभला. टाळ्यांचा कडकडाट आणि वन्स मोरची मागणी यात अतिशय मधुर सुरातील गीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता आला. संपूर्ण वेळ प्रेक्षकांना खुर्चीत खिळवत विविध गीतांची मेजवानी देण्याची उत्तम कसरत स्वराच्या गायक कलाकारांनी केली. त्यामध्ये सी ए विनोद इनामदार, तरूणकुमार शर्मा, शशिकांत नलावडे, गोपाळ कोकाटे, मीरा भावे, वैजयंती पाटील, माधुरी हरमकर आणि वेरोनिका चार्ली यांचा समावेश होता. अतुल इनामदार आणि सीमा खैरनार हे या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रित होते. त्यांनी उत्कृष्ट गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यापुढील सर्व कार्यक्रमांना सर्वोतोपरी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन अतुल इनामदार यांनी दिले. सुरमयी शाम या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना स्वरा मुजिकल्सच्या ऍड शोभा कदम यांनी असून परिसरातील नवोदित गायकांना संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निराली मांकड यांनी केले.
कार्यक्रमास ध्वनी संयोजन राजेंद्र किरवे, व्हिडिओ विक्रम क्रीअशन, जाहिरात नागन्ना झलकी आणि फोटोग्राफी अमित काळे याचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात हे चिंचेचे झाड, शोधू कुठे प्रिये तुला, रोते हुए आते सब , आजा सनम मधुर चांदणी या गीतांनी झाली तर मध्यंतरानंतर ओ मेरी झोराजबी, मनाच्या धुंदीत, मळ्याच्या माळ्यामध्ये ,हर किसीको नहीं मिलता प्यार, कितना प्यारा वादा, सांग कधी कळणार तुला, कजरा मोहबतवाला या गीतांना तर वन्स मोअर देऊन रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *