गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना डाँ.भारती चव्हाण यांचे निवेदन…

आज सोमवार दि.२१ जुन २०२१ रोजी मा.श्री राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांची गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अध्यक्षा डाँ.भारती चव्हाण यांनी भेट घेतली.पुणे,व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील सर्व गुणवंत कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करणेबाबत मा.जिल्हाधिकारी यांनी सहमती दर्शविली असुन आज गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांचे वतीने सदर नियुक्ती करणेबाबत निवेदन देण्यात आले या वेळी पुणे शहर कार्यकारीणी वतीने १८ गुणवंताचे अर्ज दाखल करणेत आले आहे.यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डाँ.भारतीताई चव्हाण, सहसचिव श्री संजय गोळे व पुणे शहराध्यक्ष श्री महादेव धर्मे उपस्थित होते..चालु वर्षातील सर्व नवनिर्वाचित गुणवंताचे फाँर्म यापूर्वीच दाखल करणेत आले असुन अजुन ज्यांचे कुणाचे सदर पदासाठी नावे द्यायाचे असतील त्यांनी ,तसेच या पूर्वी नियुक्ती होऊन पाच वर्षाची मुदत पूर्ण झालेल्या गुणवंतांनाही परत अर्ज करता येईल..

Advertise

त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राबाबत पुणे शहर साठी पुणे शहराध्यक्ष श्री महादेव धर्मे यांना संपर्क करावा तसेच पिंपरी चिंचवड शहर मधील अर्जासाठी शहराध्यक्ष श्री बशीर मुलाणी व कोअर सदस्य श्री श्रीकांत जोगदंड यांना संपर्क करावा.तसेच पुणे जिल्ह्यातील गुणवंतांनी कागदपत्रे जमा करणेबाबत सहसचिव श्री संजय गोळे यांना संपर्क करावा…त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी लवकरच पाठवली जाईल…तरी कृपया ईच्छुकांनी ताबडतोब संबंधित व्यक्तींना संपर्क करुन आपापले कागदपत्रे जमा करुन सहकार्य करावे ही विनंती …

डाँ भारती चव्हाण ,अध्यक्षा,गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य,सचिव राजेश हजारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *