(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)
शिरूर –
येथील कुंभार आळी मित्र मंडळ व विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने, संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७०४ व्या पुण्यतिथी निमीत्त, डॉ सिधुंताई सपकाळ यांच्या मनःशांती छात्रालयातील विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तु, फळे, मास्क, सॅनिटायझर व खाऊ देऊन साजरी करण्यात आली.
सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरी, गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पुजन करत, त्यांची पुण्यतिथी साजरी केली. तसेच शिरूर येथील कुंभार आळी येथे, घरोघरी औषध फवारणी करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे पुणे जिल्हा सचिव भगवान श्रीमंदिलकर म्हणाले की, संत शिरोमणी गोरोबा काकांच्या विचारांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून, कुंभार आळी मित्र मंडळ व विठ्ठल मंदिर ट्रस्टने राबविलेला उपक्रम स्तुत्य असुन, समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अमित शिर्के म्हणाले की, असे अनेक उपक्रम हाती घेतले असुन यापुढील काळातही समाजातील युवकांना बरोबर घेऊन ते पुर्ण करणार आहे.
शिरूर येथील रामलिंग रोडवरील या मनःशांती छात्रालयात झालेल्या कार्यक्रमावेळी जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर, पत्रकार अनिल सोनवणे, पत्रकार रविंद्र खुडे, शिवसेना उपशहर प्रमुख संदिप जामदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे नितीन जामदार, अमोल गोरे, संतोष जामदार, शंकर जामदार, चैतन्य जामदार, नितीन शिर्के, रवी लेडें, सुनिल शिर्के, अमोल जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
【 *अडचणीच्या काळात कुंभार समाजाने मनःशांती छात्रालयास भरघोस मदत दिली असून, त्यामध्ये फळे, खाऊ, गरजेच्या वस्तु, मास्क ई. गरजेच्या वस्तू दिल्या. तसेच कुंभार समाजामुळे आश्रमातील मुलांना, यंदाच्या मोसमामध्ये पहिल्यांदाच आंब्याच्या रसाचे जेवण असणार आहे, त्याबद्दल सिंधुताई सपकाळ (माई ) यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो – विनय सिंधुताई सपकाळ* 】
या निमित्ताने सर्व जनतेला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने आवाहन करण्यात येतेय की, आपल्या आसपासच्या अनेक गरजवंतांना कोरोनाच्या या संकटसमयी मदतीची आवश्यकता असू शकते, अशांना आपण आपापल्या परीने मदत करूयात व सामाजिक बांधिलकीची कास धरूयात.