नारायणगावात ‘ओमायक्रॉन’ चा आणखी एक रूग्ण

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२१ डिसेंबर २०२१

नारायणगाव


रुग्णांची संख्या झाली ८

नारायणगाव व वारूळवाडी (ता.जुन्नर) येथील सात जण दि १७ रोजी ‘ओमायक्रॉन’ पॉझिटीव्ह आल्यानंतर रविवार दिनांक १९ रोजी सायंकाळी वारूळवाडी येथील एक अल्पवयीन रूग्ण ‘ओमायक्रॉन’ पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पर्यटनासाठी यूएई, दुबई येथे गेलेल्या १६ जणांपैकी आता पॉझिटिव रुग्णांची संख्या एकुण ८ झाली आहे. अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली. नुकतेच दुबई वरून आल्यानंतर त्यांचे तात्काळ आर टी पी आर – (rtpcr) नमुने घेण्यात आले. हे नमुने दिनांक १२ डिसेंम्बर रोजी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी एकूण ७ व्यक्तींचे नमुने (दि १७) रोजी OMICRON पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान नारायणगाव वारूळवाडी परिसरात रविवारी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दुबईला गेले होते पर्यटनसाठी

सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आले आहेत. ते नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. ‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असून या रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. हा व्हायरस तात्काळ पसरत असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. मात्र या सर्व रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून घाबरून जाण्याची गरज नाही अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *