हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय नॅशनल रोइंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंना मिळालेल्या सुवर्ण यश

पिंपरी-चिंचवड
हुसेन सागर हैदराबाद येथे 24 वी सब जूनियर आणि 6 वी चॅलेंजर नॅशनल रोइंग स्पर्धा पार पडली.
सदर नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 10 मेडल प्राप्त करत चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली.
पिंपरी-चिंचवड शहरातून सहभागी खेळाडूंनी दहा पैकी पाच मेडल जिंकत पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकात भर घातली.


पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी दोन गोल्ड आणि तीन ब्राँझ मेडल मिळवत एकूण पाच मेडल प्राप्त केले.
नॅशनल रोइंग स्पर्धा सिंगल्स स्कल, डबल स्कल, स्वीप पेअर, फोर स्वीप याप्रमाणे मुलांच्या आणि मुलींच्या गटात खेळवल्या जातात.
हैदराबाद येथील नॅशनल रोइंग स्पर्धेत देशभरातून एकूण 20 राज्यांनी सहभाग घेतला होता.

मागील वर्षी जुलै महिन्यात तात्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व आर्मी रोइंग नोड कासारवाडी यांच्या सहकार्याने खेळाडूंची निवड करण्यात आली होती व सदर खेळाडू आर्मी रोईंग नोड या ठिकाणी सराव करतात.खेळाडूंना सीएमई दापोडी या ठिकाणी असलेल्या आर्मी रोइंग नोड या ठिकाणी उत्तम असे प्रशिक्षण प्राप्त झाले त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद झाली आहे.

या खेळाडूंना आर्मी रोइंग नोडच्या विविध नॅशनल आणि इंटरनॅशनल कोचचे मार्गदर्शन लाभले व महाराष्ट्र रोइंग असोसिएशन चे सहकार्य लाभले आणि हे खेळाडू नॅशनल मध्ये यशस्वी झाले.सब जूनियर नॅशनल रोइंग स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
वैभवी मोटे (सिंगल्स कल गोल्ड मेडल),ईश्वरी फपाळ व सिद्धी गुरव( स्वीप पेअर गोल्ड मेडल),कृष्णराज चव्हाण व अंश गायकवाड (डबल स्कल ब्राँझ मेडल) व आदित्य कोळेकर, अभिषेक सिंग, साहित्य बरार व स्नेहल बोहरा( फोर स्वीप ब्राँझ मेडल)
तसेच चॅलेंजर नॅशनल रोइंग स्पर्धेत
आर्या नाईक व सानिका माने (स्वीप पेअर ब्राँझ मेडल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *