त्रिवेणी शुभ संगमाच्या शुभ मुहूर्तावर पाच मान्यवर महिलांच्या शुभ हस्ते कुकडी माईच्या तीरी गंगा आरती झाली संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१६ ऑगस्ट २०२२

ओझर


विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र ओझर येथे अष्टविनायका मध्ये प्रथमच संकष्टी चतुर्थी ,स्वातंत्र्य दिन व श्रावणी सोमवार अशा त्रिवेणी शुभ संगमाच्या शुभ मुहूर्तावर गंगा आरती ठीक संध्याकाळी सात वाजता संपन्न झाली. गौरीताई अतुलशेठ बेनके ,कांचनताई प्रताप ढमाले ,सुरेखाताई दिलीप अण्णा मोहिते ,सारिका ताई सुनील अण्णा शेळके व राणीताई निलेशजी लंके या पाच मान्यवर महिलांच्या शुभहस्ते कुकडी माईच्या तीरी गंगा आरती संपन्न झाली. ही गंगा मातेची आरती सुरू असताना अतिशय भक्तिमय असे वातावरण या ठिकाणी तयार झाले होते. जणू काही काशी मधील गंगा मातेची आरती चालू असल्याचा भास या ठिकाणी होत होता.

देवस्थान ट्रस्ट तर्फे या सर्व मान्यवर व्यक्तींच्या हस्ते बाप्पांस अभिषेक , गणेश दर्शन व आदर सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या गंगा आरतीस ओझरचे सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी ,गणेश भाविक भक्त व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा गंगा आरतीचा उपक्रम विघ्नहर देवस्थान ट्रस्ट आजपासून येणारा प्रत्येक चतुर्थी दिनी राबविणार असल्याचे गणेश भाऊ कवडे यांनी सांगितले. यावेळी सर्वांचे लाडके गायक राहुल दुधवडे व त्यांच्या टीमने गणपती बाप्पा, भगवान शंकर व गंगा मातेची सुगम अशी आरती गायली .तसेच देशभक्तीपर गीतेही या ठिकाणी गाण्यात आली. ग्रामस्थांचा व भक्तगणांचा या गंगा आरतीस पहिल्यांदाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. गंगा आरती नंतर सर्व मान्यवर महिलांनी या गंगा आरती बद्दल आपल्या भावना कुकडी माईच्या तीरावर व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोढवे तर आभार प्रदर्शन कैलास घेगडे यांनी मांडले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *