पोलीस पाटील परीक्षेत यश मिळवत शिरूरच्या १७ गावचे पो. पाटील पदभार सांभाळणार : वडनेरच्या स्नेहल नीचीत तालुक्यात प्रथम

 विभागीय संपादक रविंद्र खुडे.
शिरूर : दि. १७/१०/२०२३.

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नुकत्याच पोलीस पाटील पदाच्या परीक्षा पार पडल्या. त्याचा निकाल लागला असून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील १७ गावांतील रिक्त पदांवर, यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता गावचे पोलीस पाटील पद भूषवीता येणार आहे. या परीक्षेत उच्च विद्याविभूषित उमेदवार होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने या शासकीय पदाला योग्य व्यक्ती आता मिळत आहेत.
या परीक्षेत तालुक्यातून वडनेरच्या सौ स्नेहल विशाल निचित, या ८० पैकी ७४ गुण मिळवत प्रथम आल्या आहेत. विशेष म्हणजे निचीत परिवाराची सातवी पिढी आता स्नेहल यांच्या रूपाने गावचे पोलीस पाटील पद भूषविणार आहे. राज्यातील हा एक विक्रमच म्हणावा लागेल. नीचित परिवाराने शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेऊन ही परंपरा कायम चालू ठेवलेली आहे.
स्नेहल निचित यांचा नुकताच सत्कार ग्रामस्थांनी केला. त्यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, “आमची सातवी पिढी आता पोलीस पाटील बनत आहे, यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही. पोलिस पाटील हे मानाचे पद आहे आणि या पदाला आमच्या कुटुंबाने नेहमीच योग्य न्याय देण्याचे काम केलेय आणि पुढेही करत राहू.”
या परिवारातील पोलीस पाटील –

 


१) रावजी पाटील, २) तुकाराम पाटील, ३) नाना पाटील, ४) कृष्णा पाटील, ५) दत्तात्रय पाटील, ६) नारायण पाटील आणि आता ७) स्नेहल पाटील.
या सात पिढ्यांतील सौ. स्नेहल विशाल निचित यांची निवड शासकीय परिक्षेतून झालेली असून, ८० पैकी ७४ गुण मिळवून त्या तालुक्यात प्रथम आल्यात. त्यांनी BE (Computer) पर्यंत शिक्षण घेतले असून एक उच्च विद्या विभूषित पोलीस पाटील स्नेहलच्या रुपाने वडनेर ग्रामस्थांना लाभल्याने, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांचे सासरे नारायण निचित हे पोलीस पाटील पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर, रिक्त झालेल्या जागेसाठी शासनाच्या नियमानुसार परिक्षा घेऊन हे पद भरले गेले. आरक्षणानुसार वडनेर गावचे आरक्षण हे सर्व साधारण महिला असे निघाले होते. त्यासाठी गावातील अनेक महिलांनी अर्ज करून परिक्षा दिली होती. परंतु त्यात सर्वाधिक गुण मिळवून पोलीस पाटील पदाचा मुकूट त्यांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर प्राप्त केला.
त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पा., मा. आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, जी प च्या मा. सदस्या सुनीता गावडे, भिमाशंकर कारखान्याचे मा. चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, शिरुर तालुका देखरेख संघाचे चेअरमन बाबाजी निचित, घोडगंगा कारखान्याचे मा. संचालक राजेंद्र गावडे, शिरुर पंचायत समिती मा. सदस्य डॉ. सुभाष पोकळे, पं. स. मा. सदस्या अरुणा घोडे, टाकळी हाजी चे सरपंच दामु आण्णा घोडे, सरपंच नवनाथ निचित आदी मान्यवर व ग्रामस्थांनी नूतन पोलीस पाटीलांचे अभिनंदन व कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
शिरूर तालुक्यातील २७ गावचे नूतन पोलीस पाटील –
१) विकास सुभाष ढगे (आपटी – (सर्वसाधारण), २) श्रीकांत दादासाहेब झांजे (गणेगाव खालसा – सर्वसाधारण), ३) सागर पंडित जगताप (गणेगाव दुमाला – इतर मागास प्रवर्ग), ४) विक्रम लक्ष्मण कर्डिले (सरदवाडी – सर्वसाधारण), ५) वर्षा योगेश थिटे (पिंपळे जगताप – सर्वसाधारण महिला), ६) स्नेहल विशाल निचित (वडनेर खुर्द- सर्वसाधारण महिला), ७) नितीन संभाजी ढोरे (वाडा पुनर्वसन – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक), ८) स्वप्नील पोपट शिवले (शिवतक्रार म्हाळुंगी – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक), ९) विशाल आबासाहेब गदादे (तांडळी – इतर मागास प्रवर्ग), १०) वर्षा नामदेव काळे (पिंपळसुटी – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, महिला), ११) साईनाथ बाबुराव गव्हाणे (डींग्रजवाडी – सर्वसाधारण), १२) रोहित बाळासाहेब दाते (काठापूर खुर्द – सर्वसाधारण), १३) दिव्या संपत करकुड (सादलगाव – विशेष मागास प्रवर्ग, महिला), १४) संदीप भाऊसाहेब पवार (कुरुळी – अनुसूचित जमाती), १५) नम्रता शहाजी पवार (सविंदणे – सर्वसाधारण, महिला), १६) काजल गौतम करकुड (वाघाळे – अनुसूचित जमाती, महिला), १७) सतीश दत्तोबा गावडे (केंदुर – अनुसूचित जमाती).

वरील यादी ही स्नेहा किसवे – देवकाते (उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग, पुणे) तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती, शिरूर यांनी प्रसिद्ध केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *