पिंपरी चिंचवड शहर सौंदर्यीकरणासाठी “आकर्षक जाहिरात होर्डिंग्ज” स्पर्धेचे आयोजन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३१ मार्च २०२२

पिंपरी


भारतातील अनेक शहरांमध्ये सौंदर्यशास्त्र, रस्त्यांची रचना, लँडस्केपिंगमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील शहर सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलेली आहेत. त्यानुसार, सुंदर शहर संकल्पनेवर अधारीत सौंदर्यशास्त्र दृश्याच्या संदर्भात निवडलेल्या पदपथांवर जाहिरात होर्डिंग्ज असलेल्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून वॉक थ्रू तयार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने “आकर्षक जाहिरात होर्डींग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असून सुमारे २५ लाख लोकसंख्या आहे. शहरामध्ये ६ मीटर ते ९० मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या रुंदीच्या सुमारे १२०० किलोमीटर रस्त्यांचे उत्तम नेटवर्क आहे. त्याअनुषंगाने सुशोभिकरणासाठी आराखडा विकसित करणे गरजेचे आहे. महापालिकेने पदपथाचे सौंदर्यपूर्ण बाबी लक्षात घेऊन सांगवी फाटा (राजीव गांधी पूल) ते मुकाई चौक याठिकाणी ३० तर रावेत रस्ता आणि जुना मुंबई पुणे रस्त्याच्या बाजूला १९ ठिकाणी पदपथांवर होर्डिंग्ज डिझाइन करण्यासाठी निवड केली आहे. नागरिकांची सुरक्षा, रस्त्यांवरील स्पष्टपणे जाहिराती, रहदारीसाठी दृश्यमान आणि रस्त्याच्या सौंदर्याचा विचार करणे देखील आवश्यक आहे. या कारणास्तव, धमनी मार्गांवरील जाहिरात होर्डिंग्जसाठी वापरल्या जाणार्‍या डिझाइन, आकार किंवा सामग्रीचा प्रकार विचारात घेणे आवश्यक आहे. यासाठी वास्तू विशारद, विद्यार्थी तसेच शहर सौंदर्यासाठी काम करणा-या संस्थाच्या मदतीने संशोधन आणि नियोजनाद्वारे पदपथावरील आकर्षक होर्डिंग्जच्या रचनेमुळे लगतचे रस्ते आणि महामार्गांचे स्वरूप बदलण्यास मदत होणार आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची माहिती

सहभागी होणा-या स्पर्धकांनी आवश्यक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. अक्षांश आणि रेखांशानुसार अचूक स्थाने ओळखणे, कॉरिडॉरच्या बाजूने होर्डिंगसाठी योग्य वाटल्यास अतिरिक्त स्थाने जोडता येणार आहे. होर्डिंग्ज डिझाइन करून त्या कॉरिडॉरचा वॉक-थ्रू व्हिडिओ तयार करणे, कॉरिडॉरचे सौंदर्यशास्त्र (होर्डिंग्ज), एलिव्हेशनल डिझाइन, डिझाइन घटक इत्यादींच्या आधारे प्रस्तावांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. स्पर्धकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मूल्यमापन समितीसमोर होर्डिंग स्ट्रक्चर/ फ्रेम, इलेक्ट्रिकल पोल किओस्क डिझाइन, युनिपोल लॉलीपॉप जाहिरात टेम्पलेट्सचे 3D वॉक-थ्रू व्हिडिओ आणि तपशीलवार सादरीकरण सादर करावे लागणार आहे. यासाठी ५ ते १० मिनिटांची उच्च-रिझोल्यूशन वॉक थ्रू व्हिडिओ फिल्म आवश्यक आहे. तसेच, व्हिडीओची गुणवत्ता व संरचनेसाठी स्पर्धकांना अधिक माहिती महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

मूल्यांकन पूर्णपणे कामाची गुणवत्ता आणि सौंदर्यशास्त्र यावर आधारित असेल. विजेत्या स्पर्धकाने जाहिरात होर्डिंग, किओस्क डिझाइन आणि युनिपोल लॉलीपॉप जाहिरात टेम्पलेट्ससाठी तपशीलांसह तपशीलवार डिझाइन प्रदान केले पाहिजे. सदर स्पर्धा खुली ठेवण्यात आली असून महापालिकेने स्थापन केलेल्या समितीद्वारे ३ विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना अनुक्रमे र.रु. ५,००,०००/-, र.रु. ४,००,०००/-, आणि र.रु. ३,००,०००/- बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांकडून मिळालेली रचना ही पिंपरी चिंचवड महापालिकेची बौद्धिक संपदा असेल, तरी जास्तीत जास्त संख्येने वास्तूविशारद, विद्यार्थी, महाविद्यालये तसेच शहर सौंदर्यासाठी कामB करणा-या संस्थांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *