खुनाच्या हेतूने अपहरण करणाऱ्या तिघांच्या ओतुर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी कैलास बोडके

आपल्या बहिणीला भेटायला चाललेल्या एकास तिघांनी दुचाकीवर बळजबरीने बसवुन खुनाच्या हेतूने अपहरण करणाऱ्या तीन आरोपींच्या ओतूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांनी माहिती दिली असून
दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वा. चे सुमारास शिवम छोटेलाल मिश्रा हा त्याचा मित्र समीर पवन सोनवणे याच्या बहिणीस ओतुर बसस्थानक येथे भेटण्यासाठी आला असता समीर पवन सोनवणे, दिपक यशवंत वाघ व एक अनोळखी मुलगा असे तिघे दुचाकीवरून आले व दिपक वाघ व अनोळखी मुलगा यांनी शिवम मिश्रा याला जबरदस्तीने समीर सोनवणे याच्या कडील मोटारवर बसून “तुम्ही याला घेवुन पुढे जा मी आलोच” असे म्हणाले समीर सोनवणे हा शिवम यास म्हणाला “तेरे को तो पता है हाफ मर्डर से तो फुल मर्डर परवडता है, आज तेरा मर्डर करता हूँ” असे म्हणून मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या अनोळखी मुलास “इसको आज जंगलमे ले जाकर मार डालते है” असे म्हणुन शिवा मिश्रा यास मोटार सायकलवरून जबरदस्तीने ओतुर बस स्थानक येथुन हायवेने कल्याण बाजुकडे घेवून जात असताना शिवम मिश्रा याने त्यांचेपासून सुटण्याचा जोरदार प्रयत्न केला मात्र पाठीमागे बसलेल्या अनोळखी मुलाने शिवम मिश्रा याचे दोन्ही हात पकडुन धरून खांद्यावर पाठीमागील बाजुस जोरात चावा घेतला त्यावेळी शिवम यास आज माझा नक्की मर्डर होणार अशी खात्रीवजा भीती वाटल्याने शिवम मिश्रा याने पुर्ण ताकतीने डावीकडे वाकून चालत्या मोटार सायकलवरून उडी मारली. सदर घटना नगर कल्याण मार्गावरील राज लॉन्स येथे घडली असून शिवम मिश्रा हा खाली पडल्याने जखमी झाला आहे. यावेळी दोन्ही दुचाकीस्वार फरार झाले. याबाबत शिवम छोटेलाल मिश्रा, (वय ३०) रा. सतीमंदिर मिथ्यारीपुरा, ता. भारताना, इटावा, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. भोसरी, ता. हवेली, जि. पुणे याने ओतुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
ओतूर पोलिसांनी
गु.र.नं. १३०/२०२३ भा.दं.वि.क. ३६४, ३२४, ३२३, ५०६.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अधिकच्या तपासात आरोपींचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेऊन १ ) समीर पवन सोनवणे, ओझर नं.१, ता. जुन्नर, जि. पुणे, २) दिपक यशवंत वाघ, रा. ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे ३) अर्जुन शंकर कांबळे, रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांना अटक केली व जुन्नर न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील
हे करत आहेत.
पोलीस निरीक्षक अनिल केरूरकर , पो.हवा. महेश पटारे,रोहीत बोबंले, विश्वास केदार, बाळशीराम भवारी, जनार्दन सापटे, मनोज कोकणी, दत्ता तळपाडे, देवराम धादवड , नरेंद्र गोराणे,देवीदास खेडकर, धंनजय पालवे या पथकाने कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *