पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.ड्रीम इलेव्हन वर दीड कोटी रुपये जिंकलेले सोमनाथ झेंडे यांच्यावर वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहोचवण्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय हे प्रकरण….
सोमनाथ झेंडे हे गेल्या काही महिन्यांपासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमिंग ॲपवर टीम लावत होते.विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर त्यांनी ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली होती.व ती अव्वल ठरली आणि त्यामधून सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आणि ते पैसे त्यांच्या खात्यात देखील जमा झाले.दरम्यान पोलीसच अशा ऑनलाइन गेमच्या अहेरी जाऊ लागल्याने माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर झेंडे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.आणि त्यानंतर त्यांच्यावर या संदर्भात कारवाई होणार असल्याचे समोर आले.आणि अखेर सोमनाथ झेंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे.त्यांच्यावर वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहोचवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याचबरोबर त्यांची येत्या काही दिवसांमध्ये विभागीय चौकशी देखील होणार आहे ज्यात त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची मुभा मिळणार आहे…