राष्ट्रवादी महिला काँगेस शिरूर शहराच्या वतीने दिव्यांगांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

शिरूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २९ जानेवारी २०२४ रोजी, शिरूर येथील छत्रपती कॉलनी येथे खास दिव्यांग महिलांकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने शिरूर शहरातील दिव्यांग महिलांसह इतरही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केली, तर अनेकांनी उखाणे घेत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. हळदी कुंकवा निमित्त वाण म्हणून सर्व महिलांना कप सेट भेट देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिजामाता महिला सहकारी बँकेच्या संचालिका तसेच मा. नगरसेविका मनीषा कालेवार, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, ज्ञानगंगा विश्वविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाखारे, पांडुरंग अण्णा थोरात विद्यालय आमदाबादच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा तज्ञिका कर्डिले, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा सुवर्णा सोनवणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस शकीला भाभी शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस रुपाली पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस शमशाद भाभी खान, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस रुपाली कोठारी, मनिषा गव्हाणे, निर्मला गिरे, ललिता पोळ, डॉ. वैशाली साखरे, शिल्पा बढे, संपदा राठोड, नम्रता गवारे, शोभा परदेशी आदी मान्यवर महिला उपस्थितीत होत्या.
यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कला प्रतिक्रिया देताना, या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या आयोजिका व शिरूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा श्रुतिका रंजनभैय्या झांबरे यांनी सांगितले की, “दिव्यांग महिला भगिनिंसोबत मी दरवर्षी हळदी-कुंकु कार्यक्रम करत असते. तो करताना मनाला खूप समाधान वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. दरवर्षी त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मला मिळत असतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *