गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकत्र येणे आवश्यक : सरपंच योगेश पाटे

दि. १३/०१/२०२३

किरण वाजगे : कार्यकारी संपादक

नारायणगाव

 

नारायणगाव :आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या कष्टकरी सामान्य आणि गरजू समाजाच्या शैक्षणिक उन्नतीचे प्रमुख केंद्र आहे. या शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्तेकडे प्राधान्याने लक्ष देणे हे सर्व राजकीय प्रतिनिधींबरोबरच जागरूक नागरिकांचे कर्तव्य आहे. या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वजण एकत्र या ‘ असे आवाहन नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले.

ग्रामपंचायत नारायणगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १,२,३, तसेच बागलोहरे गावठाण, कोल्हे मळा, पाटेखैरे मळा, नारायणवाडी, आर्वी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव २०२२ – २३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी सरपंच पाटे बोलत होते.

यावेळी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी माधुरी शेलार, उपसरपंच आरीफ आतार, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, माजी उपसरपंच संतोष वाजगे, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, संतोष दांगट, सारिका डेरे. मनिषा मेहेत्रे, ग्रा प सदस्य संतोष पाटे , गणेश पाटे, अक्षय वाव्हळ, अनिता कसाबे, अश्विनी ताजने, रुपाली जाधव , हेमंत कोल्हे, भागेश्वर डेरे, अजित वाजगें, जालिंदर खैरे, पपू भूमकर, ईश्वर पाटे उपस्थित होते.

यावेळी नारायणगाव सांस्कृतिक महोत्सवासाठी पालक, विद्यार्थी,शिक्षक, आणि नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात समूह गीत, नृत्य,नाटिका, नाट्यछटा, भाषण इत्यादी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोषनाना खैरे,उपाध्यक्ष किरण वाजगे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ् शुभदा वाव्हळ, सोपान कोल्हे, शरद दरेकर इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतच्या वतीने भौतिक सुविधा निर्मिती व सुधारणा,ई लर्निंग साठी सुविधा, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन,आरोग्य तपासणी, शालेय वस्तू वाटप कार्यक्रम,पालक सभा इत्यादींचे आयोजन सातत्याने करण्यात येते.अशी माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक शाळा प्रमुख शिक्षक वृंद ग्रामपंचायत नारायणगावचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

सहभागी सर्व शाळांना स्मृती चषक व विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खैरे यांनी केले व सूत्रसंचालन मेहबूब काझी, भाग्यश्री बेलवटे यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रा.पं. सदस्य गणेश पाटे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *