निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी खुले करावे – दत्तात्रय भालेराव

शहरातील नागरिकांना वन्य जीवांची माहिती मिळावी या करिता महानगर पालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड संभाजीनगर येथे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय उभारण्यात आले, शहरातील नागरिक, शालेय विद्यार्थी यांना अभ्यास पूर्ण माहिती आणि वन्य जीवांना जवळून पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती.
परंतु हे प्राणी संग्रहालय देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २०१७ पासून नागरिकांसाठी बंद करण्यात आले, आज साल २०२३ सुरू असून मागील पाच वर्षात ठेकेदार, पालिका प्रशासन, राजकीय नेते यांच्या गदारोळात हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे, मागील पाच वर्षात देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही या कारणास्तव हे प्राणी संग्रहालय आजही बंद असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.

महोदय आपण स्वतः जातीने लक्ष घालून प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी सुरू होणे साठी प्रयत्न करावेत, जेणे करून शहर वासियांना याचा फायदा होईल व या अनुषंगाने पालिकेला आर्थिक लाभ सुध्दा मिळेल.
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून आपणास विनंती व या संदर्भात आपणास निवेदन देण्यात येत आहे. असे पत्रा द्व्यारे शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव यांनी आयुक्त शेखर सिहं यांच्याकडे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *