घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने श्रमदानातून स्वच्छता अभियान संपन्न

घोडेगाव-
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी


पुणे जिल्हा परिषद,पुणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छताही सेवा एक तास श्रमदान या उद्देशाने स्वच्छता अभियान पार पडले. ग्रामपंचायत घोडेगाव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,अंगणवाडी घोडेगाव यांनी देखील यात सक्रिय सहभागी घेत श्रमदानातून स्वच्छता केली. ग्रामपंचायत परिसर,स्मशानभूमी परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी शासनाने राबवलेल्या स्वच्छ भारत या योजने अंतर्गत स्वच्छतेसाठी सामूहिक योगदान कचरामुक्त भारत,कचरामुक्त जिल्हा,कचरामुक्त गाव या कार्यक्रमांतर्गत घोडेगाव शहरात व स्मशानभूमी येथे कचऱ्याची श्रमदानातून सफाई करण्यात आली. यावेळी घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे ,उपसरपंच सोमनाथ काळे ग्रामपंचायत सदस्य सुनील इंदोरे, मनोज काळे, अमोल काळे, स्वप्नील घोडेकर, कपिल सोमवंशी, संगीता भागवत, नंदा काळे,कांचन काळोखे,ज्योती गाडे,रुपाली जांबुकर,सारीका घोडेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अलका चासकर,राजाराम काथेर,घोडे,शेळके,शालेय यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळे, विस्ताराधिकारी रंजना अवसरे,कोतवाल ज्ञानेश्वर घोडेकर वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी तळेगाव येथील विद्यार्थी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग कचरा साफसफई करण्यासाठी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *