महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री कै. प्रा.रामकृष्ण मोरे साहेब यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराकडून विनम्र अभिवादन !

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी,ओझर
८ नोव्हेंबर २०२१

ओझर


महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे साहेब यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!मोरे साहेबांनी मंत्री पदाच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना दूरदृष्टीचा नेता म्हणून ओळखले जाते. पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण मराठी माध्यमातून सुरू करून दुरगामी निर्णय घेतला.राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण आखून त्याला मूर्त स्वरूप दिले.वाड्यावस्त्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वस्ती शाळा सुरू केल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री या नात्याने अविस्मरणीय कामगिरी केली.विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर वडीलांबरोबर आईचेही नाव समाविष्ट करून आपला दूरदृष्टीपणा दाखवून दिला.साहित्य संस्कृती मंडळ,राज्य मराठी विकास परिषद आदी संस्थांच्या कार्याला गती दिली.कला क्षेत्रातील संस्थांची आणि व्यक्तींची विशेष दखल घेवून त्यांना न्याय देण्याचे धोरण आखले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून जवळजवळ २० वर्षाहून अधिक वर्षे नेतृत्व करताना या संस्थेला ‘ आदर्श शिक्षण संस्था ‘ म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माणकरून दिली.अशा दूरदृष्टीचे नेतृत्व देणा-या (नेत्यास) प्रा.रामकृष्ण मोरे साहेबांस आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवारातर्फे विनम्र अभिवादन .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *