भोसरी मध्ये आप ची स्वच्छता दिंडी, स्वच्छता दिंडी काढून महापुरुषांना जयंती निमित्त मानवंदना

2 ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे भोसरी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिंडी चे आयोजन करण्यात आले.

गांधी जयंती निमित्त देशभरामध्ये स्वच्छता सप्ताह पाळण्यात येतो. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी आम आदमी पार्टी चे अशोक भाऊ लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भोसरी या मार्गावर भोसरी प्रभाग 6 मधील नागरिक, आपचे कार्यकर्ते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी व पदाधिकारी यांच्या समवेत टाळ मृदुंगाच्या तालावर बाल वारकऱ्यांनी या स्वच्छता दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी संत गाडगे महाराज यांच्या देवकीनंदन गोपाला या भजनावर बाल वारकऱ्यांनी ठेका धरला. या कार्यक्रमाचे आयोजन भोसरी येथील आपचे नेते अशोक भाऊ लांडगे व दत्तात्रेय काळजे यांनी केले.
ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जागरूक व्हावे म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्याने ही स्वच्छता दिंडी आयोजित करण्यात आल्याचे अशोक भाऊ लांडगे यांनी सांगितले

स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त करताना आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले की महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण राजकीय चिखलफेकी मध्ये बरबटले आहे, यावर पर्याय म्हणून आम आदमी पार्टीचा झाडूच हा कचरा साफ करेेल.

यावेळी आपचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे, अशोक भाऊ लांडगे, दत्तात्रय काळजे, ह भ प बाळासाहेब गुळवे, ह भ प सुरेश लांडगे, ह भ प रामभाऊ लोंढे, ह भ प सुरेशभाऊ डोळस, पै संजय शिंदे, सानप साहेब, सौ निता हुले, सौ. नीलम डोळस सौ. शशिकला लांडगे, यशवंत कांबळे, संतोष इंगळे, गोकुळ नवले, स्मिता पवार, वाहक शेख, सचिन पवार, कमलेश रणवरे, अजय सिंग आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *